Suresh Dhas : बीड कारागृहात वाल्मीक कराडकडे स्पेशल फोन, आमदार सुरेश धस यांचा दावा
वाल्मीक कराड प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. बीड जिल्हा कारागृहात एक स्पेशल फोन सापडला आहे. हा फोन आका अर्थात वाल्मीक कराड वापरत होता. या फोनचे कॉल डिटेल्स काढले तर सर्व काही काळेबेरे बाहेर येईल, असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला.