MLA Satish Sail : कर्नाटकात काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.41 कोटी, 6.75 किलो सोने जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई
कर्नाटक काँग्रेसचे आमदार सतीश कृष्णा साईल यांच्या घरातून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) १.४१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ईडीने त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या बँक लॉकरमधून ६.७५ किलो सोन्याचे दागिने आणि बिस्किटे जप्त केली आहेत.