एकीकडे राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी; पण आमदार संग्राम जगतापांना आवरता येई ना म्हणून अजितदादांची गोची!!
एकीकडे अजितदादांची स्वबळाची तयारी; पण आमदार संग्राम जगताप यांना आवरता येई ना म्हणून झाली गोची!!, अशी अवस्था अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झालीय.महापालिका, जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना स्वबळाची खुमखुमी आली. ती प्रफुल्ल पटेल आणि अनिल भाईदास जगताप यांच्या तोंडून बाहेरही पडली. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद एवढी तोकडी की त्यांना पुणे जिल्हा परिषद, सातारा जिल्हा परिषद पुणे महापालिका किंवा पिंपरी चिंचवड महापालिका यापलीकडे फारसे स्थानही नाही.