MLA Phuke : आमदार फुकेंचा आरोप – लक्षवेधी लावण्याची धमकी देऊन पैशांचीही मागणी; गडचिरोलीतील राईस मिल मालकांना ब्लॅकमेलचा प्रयत्न
गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिलधारकरांनी चुका केल्या होत्या. त्यांच्यावर कारवाईही झाली होती. आता तशाच कारवाया परत करण्याची धमकी त्यांना दिली जात आहे. सभागृहात लक्षवेधी लावून आम्ही तुमच्यावर कारवाई करू. तुमची राईस मिल बंद करू. तुम्हाला जेलमध्ये टाकू, अशा प्रकारचे इशारे राईस मिलधारकांना दिले जात असल्याचा आरोप भाजपचे विधान परिषदेतील भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. इतकेच नाही तर आमदार फुके यांनी याबाबत एजंटासोबत झालेल्या कॉलची ऑडिओ क्लिपही विधिमंडळात सादर केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.