Jitendra Awhad : आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? विधिमंडळातील घटनेवर आव्हाडांचा संताप, तर पडळकरांकडून दिलगिरी
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आज विधानभवनाच्या लॉबीत एकमेकांना भिडल्याची घटना घडली. या घटनेवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे लोक मलाच मारण्यासाठी आले होते, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तर आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला. तर गोपीचंद पडळकर यांनी या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे.