MLA Amol Khatal : शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला; मंत्री विखे पाटलांनी केला हल्ल्याचा निषेध
शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटनावेळी हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या कार्यक्रमात गेले असता अमोल खताळ यांच्याशी हात मिळवण्यासाठी एक तरुण आला आणि यावेळी त्याने हल्ला केला असल्याचे समजते. मात्र, या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.