Mithun Manhas : मिथुन मन्हास BCCIचे नवे अध्यक्ष; जम्मू-काश्मीरसाठी अंडर-19 व दिल्लीसाठी रणजी खेळले
माजी स्थानिक क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर (एजीएम) रविवारी ही घोषणा करण्यात आली. त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली.