Pankaja Munde : मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही, माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला, पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण
मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला, असे विधान मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, मी जरांगे यांना देखील सांगू इच्छिते. आपल्या समाजामधील दरी मिटवूयात. जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्व आहे तेच माझे व्यक्तिमत्त्व आहे, असेही मुंडे म्हणाल्या. परळी येथे आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.