Ministry of External : परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा, पाकिस्तानी नागरिकांनी व्हिसा अवधी संपण्यापूर्वीच भारत सोडावा
भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तत्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द मानले जातील. शिवाय, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा फक्त २९ एप्रिल २०२५ पर्यंत वैध असतील.