Minister Patil : मुलींच्या फीमाफीसाठी मंत्री पाटील 100 कॉलेजेसना अचानक भेट देणार; मुलींना मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीत तक्रारी
महायुती सरकारने मुलींसाठी मोफत शिक्षण योजना जाहीर केली. मात्र, त्याची शंभर टक्के अंमलबजावणी होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्याची दखल घेऊन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी शुक्रवारी पुण्यातील गरवारे कॉलेजला अचानक भेट देऊन मुलींना फीमाफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. लवकरच राज्यातील १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.