Police Lathicharge : अरवली पर्वत वाचवण्यासाठी आंदोलन, जोधपूरमध्ये लाठीचार्ज, अनेक शहरांमध्ये पोलीस-आंदोलक भिडले
राजस्थानमधील अरवली पर्वतरांगेत खाणकामाला मंजुरी मिळाल्याने संतप्त लोकांनी सोमवारी आंदोलन केले. काँग्रेस आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांची उदयपूर कलेक्टरेटमध्ये पोलिसांशी धक्काबुक्की झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. येथे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटकही केली. सीकरमधील ९४५ मीटर उंचीवर असलेल्या हर्ष पर्वतावर आंदोलन करण्यात आले.