CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची
संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी बुधवारी सांगितले की, कालच्या शस्त्रांनी आपण आजच्या लढाया जिंकू शकत नाही. ते म्हणाले की, परदेशातून आयात केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्याने आपली युद्ध तयारी कमकुवत होते.