India Russia, : भारत-रशिया एकमेकांचे लष्करी तळ वापरू शकतील, संरक्षण कराराला रशियन संसदेची मंजुरी
रशियाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृह, स्टेट ड्यूमाने, मंगळवारी भारत आणि रशिया यांच्यातील ‘RELOS’ या लष्करी कराराला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्या लष्करी तळांचा, सुविधांचा आणि संसाधनांचा वापर आणि देवाणघेवाण करू शकतील.