Trump : ट्रम्प यांनी विचारले- चीनवर हल्ला केला तर कोण साथ देणार? जपान गप्प राहिला, ऑस्ट्रेलियाने म्हटले- काल्पनिक प्रश्नांची उत्तरे नाहीत
तैवानवरून चीनसोबत युद्ध झाल्यास अमेरिकेने ऑस्ट्रेलिया आणि जपानला त्यांची भूमिका मांडण्यास सांगितले.फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या पेंटागॉनचे संरक्षण उपसचिव एल्ब्रिज कोल्बी यांनी या मुद्द्यावर ऑस्ट्रेलियन आणि जपानी संरक्षण अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत.