Milind Deora : आझाद मैदानावरील आंदोलनास बंदीच्या मागणीवर मिलिंद देवरा यांची माघार
आझाद मैदानात आंदोलनं होऊ नयेत अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिल्यानंतर, शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा चौफेर टीकेच्या भोवऱ्यात सापडले. विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केल्यामुळे आता त्यांनी आपल्या भूमिकेवरून माघार घेतली आहे.