MIDC villages : औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी MIDC गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीच्या आढावा बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यांनी एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासंदर्भात धोरण तयार करण्याचे निर्देश दिले. ज्यामुळे त्या भागांचा वेगाने विकास होईल आणि मूलभूत सुविधा अधिक सक्षम करता येतील.