PM Modi : PM मोदी आज बंगळुरूमध्ये; मेट्रोच्या यलो लाइनचे उद्घाटन आणि तीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. येथे ते बंगळुरू आणि राज्यासाठी अनेक विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. या प्रकल्पांचा एकूण खर्च २२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.