Delhi Metro : दिल्ली मेट्रोच्या फेज 5 (A) ला सरकारची मंजुरी; 13 नवीन मेट्रो स्टेशन बांधले जातील, दिल्ली-NCRमध्ये नेटवर्क 400 किमीच्या पुढे जाईल
दिल्लीत बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, दिल्ली-एनसीआरमध्ये मेट्रोच्या विस्तारासाठी दिल्ली मेट्रोच्या फेज 5A ला सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी ₹12015 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.