Bengaluru Surgeon : तुझ्यासाठी माझ्या बायकोला मारले, बंगळुरूतील सर्जनचा हत्येनंतर 4-5 महिलांना मेसेज; पत्नीची भूल देऊन केली हत्या
कर्नाटकातील बंगळुरू येथे पत्नी डॉ. कृतिका एम. रेड्डी (२९) हिच्या हत्येचा आरोप असलेले सर्जन डॉ. महेंद्र रेड्डी जीएस यांच्याबद्दल पोलिसांनी मंगळवारी धक्कादायक खुलासे केले. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने हत्येच्या काही आठवड्यांनंतर चार ते पाच महिलांना मेसेज पाठवले होते.