Meghalaya : भारत 5वा प्रदूषित देश, मेघालयचे बर्निहाट ठरले सर्वात प्रदूषित शहर
जगभरातील प्रदूषित शहरांबाबत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, २० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील १३ शहरांचा समावेश आहे. मेघालयातील बर्निहाट शहर हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. सर्वात प्रदुषित राजधानीमध्ये दिल्ली अव्वल आहे. स्विस एयर क्वॉलिटी टेक्नोलॉजी कंपनी आयक्यूच्या “जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२४’ मधून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.