Medha Patkar : मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक
दिल्ली पोलिसांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक केली आहे. त्यांना निजामुद्दीन येथून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आज दुपारी त्यांना साकेत कोर्टात हजर केले जाईल.