Mayawati : मायावती यांच्या पुतणीला हुंड्यासाठी जबर मारहाण; न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल
बसप प्रमुख मायावती यांच्या पुतणीने तिच्या पती आणि सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ, मारहाण आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, हापूरनगर पोलिस ठाण्यात तिच्या पतीसह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.