Mayawati : मायावतींनी 40 दिवसांनी भाचा आकाश यांना माफ केले; बसपात वापसी; म्हणाल्या- उत्तराधिकारी बनवणार नाही!
रविवारी आकाश आनंदला त्यांची आत्या आणि बसपा प्रमुख मायावती यांनी माफ केले. बसपामधून काढून टाकल्यानंतर ४१ व्या दिवशी आकाश यांनी पक्षात पुन्हा प्रवेश केला आहे. पक्षातून काढून टाकण्यापूर्वी आकाश हे बसपा प्रमुखांचे राष्ट्रीय समन्वयक आणि उत्तराधिकारी होते. मायावती यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत त्या निरोगी आहेत, तोपर्यंत त्या कोणालाही त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करणार नाहीत.