”गरीब मुस्लिमांना फायदा होईल…”; वक्फ विधेयक मंजूर झाल्यावर मौलाना शहाबुद्दीन रझवी यांचं विधान
अखिल भारतीय मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी लोकसभेत मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ चे स्वागत केले आहे. त्यांनी या विधेयकाचे वर्णन भारत सरकारने वाईट प्रवृत्ती दूर करण्यासाठी उचललेले एक चांगले पाऊल असल्याचे सांगितले.