Matoshree : ‘मातोश्री’वर राऊत- सावंतसह नार्वेकरांचा ताबा; ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारींची आरोपांनंतर हकालपट्टी
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पक्षातील अनेक नेते आणि पदाधिकारी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत आहेत. यातच उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी पक्षाला घरचा आहेर देत मातोश्रीवर ताबा मिळवला असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पक्षाच्या वतीने आता त्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.