Massajog murder case : मस्साजोग हत्याकांड: 81व्या दिवशी आरोपपत्र दाख; खंडणी, मारहाण, खुनाची एकमेकांशी लिंक
मस्साजोग (ता.केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या झाली होती. या घटनेनंतर ८१ व्या दिवशी सीआयडी व एसआयटीने गुरुवारी १ हजार पानांचे दोषारोपपत्र बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दाखल केले. यात आतापर्यंत ८ आरोपींना अटक झालेली असून कृष्णा आंधळे फरार आहे.