Masood Azhars : ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ जणांचा मृत्यू
भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय मसूद अझहरचा दहशतवादी भाऊ रौफ असगर देखील या हल्ल्यात सापडला आहे. मारल्या जाणाऱ्यांच्या यादीत मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफाचाही समावेश आहे. याशिवाय रौफ असगरच्या भावाच्या पत्नीच्या मृत्यूची बातमीही येत आहे.