Thailand-Cambodia : थायलंड-कंबोडिया संघर्षात 33 मृत्यू; कंबोडियाने ग्रॅड क्षेपणास्त्रे डागली, थायलंडने मार्शल लॉ जाहीर केला
थायलंड आणि कंबोडियामध्ये १००० वर्षे जुन्या दोन शिवमंदिरांवरून सुरू असलेला संघर्ष तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या संघर्षात आतापर्यंत ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या लढाईत त्यांच्या १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आठ नागरिक आणि पाच सैनिकांचा समावेश आहे. याशिवाय ७१ जण जखमी झाले आहेत.