High Court : हायकोर्टाने म्हटले- लग्नास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही; तरुणाची निर्दोष मुक्तता
महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या प्रकरणात बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल दिला. न्यायालयाने म्हटले की, केवळ त्या पुरूषाने संबंध संपवले आणि नंतर महिलेने आत्महत्या केली, त्यामुळे पुरूषाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करता येणार नाही.