Shashi Tharoor : शशी थरूर यांची मॅरिटल रेपला गुन्हा ठरवण्याची मागणी; लोकसभेत तीन खासगी विधेयके मांडली
लोकसभेत शुक्रवारी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी तीन खासगी सदस्य विधेयकं सादर केली. एका विधेयकात वैवाहिक बलात्काराला गुन्हा घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर इतर दोन विधेयकं राज्यांची पुनर्रचना, काम करणाऱ्या लोकांचे कामाचे तास आणि मानसिक आरोग्याशी संबंधित आहेत.