Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी सैन्य सीमेवर वारंवार गोळीबार करत आहे आणि नागरिकांना लक्ष्य करत आहे. शुक्रवारी मध्यरात्री, पाकिस्तानी सैन्याने ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांचा वापर करून भारतीय लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. भारतीय सैन्याने बहुतेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेत पाडले आहेत. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली आहे.