Fadnavis ; उद्धव ठाकरे घराबाहेर पडल्याचा आनंद, ठाकरेंचे विकासावर भाषण दाखवा अन् हजार रुपये मिळवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत. त्याचा मला आनंद आहे. पण ते टोमणे मारण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत, असे ते म्हणालेत.