CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मराठवाड्यातील पूरस्थितीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मराठवाडा, पश्चिम विदर्भ, सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात तर अक्षरशः ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडून मराठवाड्यातील सात जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच अधिकारी वर्गाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.