मराठवाडा आणि सोलापूर; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आणि त्यानंतरच्या मदतीची नेमकी आकडेवारी समोर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि सोलापूर जिल्हाधिकार्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला. यातून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आणि मदतीची नेमकी आकडेवारी समोर आली. नागरिकांना मदत करताना अधिकाऱ्यांनी फिल्डवर राहावे. केवळ नियम आणि कायद्यावर बोट ठेवून काम करू नये मदत करताना सरळ हात असावा अशा सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.