पवार स्वागताध्यक्ष म्हणून दिल्ली साहित्य संमेलनाचा मोठा गाजावाजा; प्रत्यक्षात साहित्य विषयक कार्यक्रमांचा बोजवारा!!
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार हे स्वागताध्यक्ष म्हणून दिल्ली मराठी साहित्य संमेलनाचा मोठा गाजावाजा झाला. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या कालच्या पुरस्कार सोहळ्यामुळे त्यात राजकीय वादाची भर पडली, पण एवढे सगळे घडत असताना प्रत्यक्षात दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनात साहित्य विषयक कार्यक्रमांचा बोजवारा उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण साहित्य संमेलन अवघ्या १० दिवसांवर आले असताना त्याची तपशीलवार कार्यक्रम पत्रिकाच संयोजकांनी अद्याप जाहीर केलेली नाही.