Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले- मराठी माणसासाठी मुंबई मनपा ही शेवटची निवडणूक, रात्र वैऱ्याची… गाफील राहिलात तर निवडणूक गेलीच समजा
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. राज ठाकरे म्हणालेत की, मुंबई मनपाच्या निवडणुकीत मतदार यांद्यावर विशेष लक्ष असू द्या. मतदार याद्या तपासून पाहा. मतदार खरा की खोटा? हे तपासून पाहा. रात्र वैऱ्याची आहे… त्यामुळे गाफील राहू नका, आजूबाजूला काय सुरू आहे यावर लक्ष असू द्या.