• Download App
    Marathi Language | The Focus India

    Marathi Language

    Shankaracharya : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले- ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेरून आले, इथल्या लोकांनी त्यांना स्वीकारले

    मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. देशभरातून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुकतेश्वरानंद यांनी राज ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या भूमिकेवर टीका केली आहे.

    Read more

    Naresh Mhaske : उद्धव ठाकरेंनी आधी त्यांच्या खासदारांना मराठी शिकवावे; प्रियंका चतुर्वेदी दोन ओळीही बोलू शकत नाहीत; शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

    शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाषण केले आणि त्यांच्या बोलण्यात पराभवाची छाया स्पष्ट दिसत होती. राज ठाकरे यांनी आमच्याबद्दल काहीही म्हटले नाही, म्हणून आम्हीही त्यांच्यावर काही बोलणार नाही, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.

    Read more

    Ajit Pawar : महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी शिकली पाहिजे; उद्योजकाच्या ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    पुण्यात एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला. यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात आधीच भाषेचा वाद सुरू असताना अशा प्रकारच्या नाऱ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील एका उद्योजकाने मी मराठी बोलणार नाही, असे म्हणत राज ठाकरेंना आव्हान केले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Raj Thackeray : मराठी शिकणार नाही, काय करायचे ते करा; व्यावसायिक सुशील केडियांचे राज ठाकरे यांना थेट आव्हान

    गत काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. सरकारने प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करणारा जीआर मागे घेतला. पण त्यानंतर मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विरोधात 5 जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्याची घोषणा केली. यामुळे मुंबईतील वातावरण तापले असताना आता उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंसारख्या लोकांना नाटक करण्याची परवानगी मिळेत असेपर्यंत आपण मराठी शिकणार नसल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केडिया यांना या प्रकरणी योग्य ते उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

    Read more

    मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मराठी भाषा संदर्शन संदर्भ विभाग, २ फेब्रुवारी पर्यंत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या, महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ,संदर्भ विभाग दादर पूर्व येथे विविध नियतकालिकांतील मराठी भाषासंबंधी लेखांचे संदर्शन […]

    Read more

    अभियांत्रिकी शिक्षण मिळणार आता मराठी भाषेमध्ये?

    विशेष प्रतिनिधी हरयाणा : AICTE मार्फत हरियाणामधील तीन इंजिनीअरिंग कॉलेजेसना बी टेक कोर्स हिंदी भाषेमध्ये घेण्याची परवानगी दिली आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत हे […]

    Read more