Pavan Tripathi : पवन त्रिपाठी यांची टीका- ठाकरे बंधूंचे मराठी कार्ड फोल ठरणार; मुंबईचा महापौर ‘हिंदू आणि मराठीच’ होणार,
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मुंबई भाजपाचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी यांनी ठाकरे बंधूंच्या (उद्धव आणि राज ठाकरे) ‘मराठी कार्ड’वर जोरदार हल्ला चढवत भाजपाच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. “मुंबईचा महापौर हा केवळ मराठीच नाही, तर प्रखर हिंदूच असेल,” अशा शब्दांत त्रिपाठी यांनी विरोधकांना ललकारले आहे.