Raj Thackeray : राज ठाकरे कडाडले- आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे; खासदार दुबेंना धमकी- मुंबईत येऊन दाखवा, समंदर में डुबो-डुबो कर मारेंगे!!
त्रिभाषा धोरणानंतर महाराष्ट्रातील वातावरण पेटलं असून सरकारला शेवटी हे धोरण मागे घ्यावं लागलं. त्यानंतर मुंबईत मराठी-हिंदी वाद पाहायला मिळाला. तसेच, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आव्हान केले होते. तुम्ही उत्तर भारतात येऊन दाखवा, तुम्हाला पटक-पटक के मारेंगे असे दुबे म्हणाले होते. यावर आज मीरा रोडमध्ये बोलतांना राज ठाकरे यांना खासदार निशिकांत दुबे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.