Dada Bhuse : महाराष्ट्रात मराठी शिकवावीच लागणार; मराठी न शिकवणाऱ्या शाळांना प्रथम समज अन् नंतर मान्यता रद्दची कारवाई, दादा भुसे यांची घोषणा
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांना प्रथम समज देण्यात येईल. त्यानंतर त्यांच्यावर थेट मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत केली.