• Download App
    Marathi Asmita | The Focus India

    Marathi Asmita

    Raj Thackeray : राज ठाकरेंनी मांडली भूमिका- मराठी माणसाच्या अस्तित्वावर उठलेल्यांना गाडून टाकण्यासाठी युती केली

    मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, या दोन पक्षांची आगामी महापालिका निवडणुकांसाठीची युती घोषित झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष म्हणून मी आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे अशी आम्ही दोघांनी या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली, अशी माहिती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत युती संदर्भात तसेच आगामी महापालिकेच्या अनुषंगाने आपले मत व्यक्त केले आहे. तसेच मराठी माणसाच्या अस्तित्वावर उठलेल्यांना गाडून टाकण्यासाठी युती केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    Uddhav Raj Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आज दुपारी 12 वाजता; मुंबई मनपासाठी उद्धव-राज एकत्र

    उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा बुधवारी दुपारी 12 वाजता होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ही माहिती दिली.

    Read more

    Ramdas Athawale : राज ठाकरेंकडे भाषणे देण्याची कला, पण त्याने नेतृत्व होत नाही, रामदास आठवले यांचा निशाणा

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्ध पेटले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत भाजपवर आणि गुजरातसंबंधी धोरणांवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरे अदानी, अंबानीला आंदण देण्यासाठी तयार केली जात आहेत. गुजरातचा वरवंटा जेव्हा महाराष्ट्रावर फिरेल, तेव्हा भाजपला मतदान करणारा मराठी माणूससुद्धा त्यात भरडला जाईल, असे राज ठाकरे म्हणाले. याचबरोबर त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी अस्मितेच्या प्रश्नावर भावनिक इशारा दिला. राज ठाकरेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर थेट निशाणा साधला आहे.

    Read more