Manoj Jarange : दिसेल त्या मार्गाने मुंबईत घुसा; मनोज जरांगे यांचा मागे न हटण्याचा निर्धार; महाराष्ट्र कायमचा बंदचाही इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आत्ता चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी बुधवारी परभणीत बोलताना मराठा समाजाला 29 ऑगस्ट रोजी दिसेल त्या मार्गाने मुंबईत शिरण्याचे आवाहन केले. आमचे आंदोलन शांततेत होईल. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही कुरापत करण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र कायमस्वरुपी बंद राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.