Devendra Fadnavis : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी मांडली भूमिका; म्हणाले – दोन समाज झुंजवणे योग्य नाही, संविधानाच्या चौकटीतच तोडगा काढावा लागणार
दोन समाजात तेढ निर्माण करणे आमच्या तत्त्वात बसत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. एका समाजाला संतुष्ट करण्यासाठी दुसऱ्या समाजाला असंतुष्ट करणे सरकारला मान्य नसल्याचेही ते म्हणालेत. सगळ्याचे समाधान काढण्यावर आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले. राज्यात युती आणि महायुतीच्या सरकारनेच मराठा समाजासाठी चांगले निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.