• Download App
    maratha reservation | The Focus India

    maratha reservation

    Radhakrishna Vikhe Patil, : विखे पाटलांची घणाघाती टीका- आज समाजात दुही, विसंवाद व संघर्ष; या पापाचे धनी शरद पवार

    भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांवर प्रखर टीका केली आहे. समाजा-समाजात आज दुही, विसंवाद आणि संघर्ष निर्माण झाला आहे. त्या पापाचे धनी शरद पवारच आहेत, अशी टीका विखे पाटलांनी केली आहे. तसेच 1994 साली जर शरद पवारांनी मराठा समाजाचा समावेश केला असता, तर आजची परिस्थिती नसती, असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगेंचा हल्लाबोल- अजित पवारांनी साप पोसलेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मराठा समाजाविरोधात काम करत असल्याचा आरोप

    ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आज थेट आणि गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. ओबीसी समाजाला लहान भाऊ मानणाऱ्या मराठ्यांविरोधात भुजबळ यांनी विनाकारण एक ‘टोळी’ निर्माण केली असून, या टोळीच्या माध्यमातून मराठा समाजावर शत्रुत्वाची भूमिका पार पाडत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. तसेच अजित पवारांच्या पक्षाचे जास्त नेते मराठा समाजाच्या विरोधात काम करतात, असा आरोप त्यांनी केला. तुम्ही साप पोसले आहे, एक दिवस तुम्हाला आमचा शब्द खरा वाटेल, असा इशाराही मनोज जरांगेंनी अजित पवारांना दिला.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगेंचा हल्लाबोल- छगन भुजबळांमुळे ओबीसींचे वाटोळे होणार; जातीवाद डोक्यात असल्याने मराठ्यांवर अन्याय केला

    मराठा आरक्षणाच्या जीआरवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू आहेत. भुजबळ यांनी जरांगे यांच्या ‘अभ्यास’, ‘शिक्षण’ आणि ‘मराठ्यांचे नेतृत्व’ यावर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर, आता मनोज जरांगे पाटील यांनीही भुजबळांवर तीव्र टीकास्त्र सोडले आहे.

    Read more

    Maratha reservation : मोठी बातमी : 2 सप्टेंबरच्या मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार

    राज्य सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजासाठी आरक्षणाचा अध्यादेश जाहीर केला होता. या निर्णयाविरुद्ध काही व्यक्तींनी उच्च न्यायालयात बऱ्याच याचिका दाखल केल्या होत्या. याचिकांकर्त्यांनी अध्यादेशावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली असली तरी न्यायालयाने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे राज्य सरकार आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

    Read more

    Manoj Jarange Patil, : मनोज जरांगे यांची टीका- छगन भुजबळ म्हणजे येवल्याचा अलीबाबा; ओबीसींचा खरा घात ओबीसी नेत्यांनीच केला

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भुजबळांचा उल्लेख येवल्याचा अलीबाबा म्हणून केला. विजय वडेट्टीवार सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर जे काही बोलत आहेत, ते छगन भुजबळांचे शब्द आहेत. या लोकांनीच ओबीसींच्या खऱ्या जाती संपवल्यात. ओबीसींनी यावर चिंतन केले पाहिजेत. या लोकांनीच त्यांचा खरा घात केला आहे, असे ते म्हणालेत.

    Read more

    Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार म्हणाले- सर्व काही एकाच समाजाला, तलवार घेऊन आमच्या माना छाटा म्हणजे जरांगेंचं समाधान होईल

    एकाच समाजाला सर्व काही पाहिजे. EWS पाहिजे, ओबीसी पाहिजे, आणि एसईबीसीमधून पाहिजेत. त्यांना सारथी-मधून फायदा पाहिजे महाज्योतीमधूनही फायदा पाहिजे. मग बाकीच्यांनी जगायचे का नाही? जरांगे पाटील यांना सांगून टाका 374 जातीच्या लोकांना तुझ्या ताकदीच्या भरवशावर समुद्रात बुडवून मारून टाकावे. ही जी सत्तेची दादागिरी आहे आणि हे बरोबर नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

    Read more

    prakash ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले- धनगर समाजाने ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व करावे; आरक्षणवादी जनतेला सोबत घ्या, सवर्णांना मतदान करू नका

    ओबीसी लढ्याचे नेतृत्व धनगर समाजाने हाती घ्यावे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. आगामी निवडणुकीत ओबीसीने आरक्षणवादी जनतेला सोबत घेऊन निवडणूक लढवावी, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. तसेच सवर्णांना मतदान करण्याऐवजी एससी-एसटी उमेदवारांना आणि ते नसतील तर मुस्लिमांना मतदान करावे, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले. धनगर समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आज पुण्यात पार पडले. या अधिवेशनात प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. या अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.

    Read more

    पराभूत निजामाने तयार केलेले गॅझेट मराठा आरक्षणासाठी स्वीकारण्याचे कारण काय??; खासदार शाहू महाराजांचा परखड सवाल

    निजामाला मराठ्यांनी तीन वेळा पराभूत केले, त्या निजामाने गॅझेट तयार केले, पण ते मराठा आरक्षणासाठी स्वीकारण्याचे कारणच काय??, असा परखड सवाल काँग्रेसचे खासदार शाहू महाराज यांनी आज केला. या एका सवालातून शाहू महाराजांनी मनोज जरांगे यांना बॅकफूटवर ढकलले.

    Read more

    Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले- उद्या निवडणुका लागल्या तरी आम्ही सज्ज, ठाकरे बंधू, आरक्षणाचा तिढा, निवडणुकांवरही भाष्य

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही, यावर चर्चांना उधाण आले असताना फडणवीस यांनी यावर भाष्य करताच चर्चांना नवा आयाम मिळाला आहे. माझ्यावर पक्ष फोडल्याचे आरोप केले जातात. पण जर कोणी म्हटले की, मी ठाकरे बंधूंना एकत्र केले, तर त्याचे श्रेय घेण्यास मला आनंदच वाटेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्रीकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका मांडली.

    Read more

    Pankaja Munde : आरक्षणाच्या मुद्द्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या- हा संघर्ष नैसर्गिक, राज्यकर्त्यांनी राजासारखे मन ठेवून सर्वांच्या हिताचा निर्णय घ्यावा

    गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप नेत्या तथा राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या संघर्षावर महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. आरक्षणावरील संघर्ष हा नैसर्गिक आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी राजासारखे मन ठेवून सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

    Read more

    Vijay Wadettiwar : ओबीसी समाजावर लढो किंवा मरोची वेळ; मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे संघर्ष पेटला, विजय वडेट्टीवार आक्रमक

    ओबीसी समाजावर लढो या मरो-ची परिस्थिती आली आहे. आतापर्यंत ओबीसींच्या 7 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील ओबीसी समाजामध्ये प्रचंड संताप आहे. दोन समाज आमने-सामने आले आहेत. मराठवाड्यात तर अनेक गावांमध्ये मराठा-ओबीसी वाद सुरू आहे हे सर्व सरकारचे पाप आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

    Read more

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    मराठा आरक्षणात हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसंदर्भातील शासन निर्णयाला (जीआर) आव्हान देणारी पहिली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. याचिकाकर्ता पीडित व्यक्ती नाही आणि याचिकेतून जनहितही स्पष्ट होत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने या वेळी नोंदवले. ज्यांना जीआरवर आक्षेप असेल त्यांनी वैयक्तिक रिट याचिका दाखल करावी, असा पर्यायही न्यायालयाने सुचवला.

    Read more

    Bhujbal : भुजबळ यांनी व्यक्त केली शंका- आज जारी झालेली कुणबी प्रमाणपत्रं योग्य आहेत का? ती 2 सप्टेंबर आधी शोधली होती का?

    राज्य सरकारने आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील मराठा उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले. पण आता मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या प्रमाणपत्रांवर शंका व्यक्त केली आहे. आज देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्र योग्य आहेत का? या प्रमाणपत्रांच्या नोंदी 2 सप्टेंबरपूर्वी शोधल्या होत्या का? असे विविध प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत.

    Read more

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा ‘चलो दिल्ली’चा नारा; मराठा समाजाचे अधिवेशन राजधानीत घेण्याची घोषणा

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण केले होते. त्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जीआर काढला. हा मराठा समाजासाठी मोठा विजय मानला जात आहे. तसेच राज्यात लवकरच सातारा गॅझेट देखील लागू होण्याची शक्यता आहे. आता मनोज जरांगे यांनी राजधानी दिल्लीत जाणार असल्याची घोषणा केली आहे.

    Read more

    Sharad Pawar : आरक्षण वादावर शरद पवारांची भूमिका- कोणतीही कमिटी एका जातीची नको समाजाची करा, सामाजिक ऐक्य हवे

    राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद सुरू आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर जारी केला. मात्र, याला ओबीसी संघटनांचा तीव्र विरोध आहे. यामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल, असा दावा ओबीसी संघटनांकडून करण्यात येत आहे. आता या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने एका जातीची समिती न करता, सर्वसमावेशक समिती तयार करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. “सरकार कोणत्याही एका जाती-धर्माचे नाही, ते सर्वांचे असायला हवे,” असेही शरद पवार म्हणालेत.

    Read more

    Jitendra Awhad : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण हवे; जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केली भूमिका

    ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावे, ही आमच्या नेत्यांची भूमिका आहे. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर सहा महिन्यांनी लोकांना कळेल की काय मिळालं? मराठा ओबीसी वाद पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये , ही भूमिका आम्ही व्यासपीठावरून जाहीर करतो, असे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती- एकही नकली व्यक्ती ओबीसीमध्ये येणार नाही; नोंदी असणाऱ्यांनाच प्रमाणपत्र मिळणार

    राज्यातील ओबीसी समाजाला कुठलाही धोका नाही. एकही नकली व्यक्ती ओबीसींमध्ये समाविष्ट होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “नकली म्हणजे जो ओबीसी नाही, तो कधीच या प्रवर्गात समाविष्ट होणार नाही. त्यासाठी सरकारने जारी केलेल्या जीआरमध्ये स्पष्ट तरतूद केली आहे,” असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांवर उत्तर देताना केला.

    Read more

    Maratha Reservation, : मराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी; 2 आरक्षणातील कोणते ठेवणार? न्यायालयाचा प्रश्न; पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला

    मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती एन. जे. जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या न्याय पीठासमोर आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर दिवसभर युक्तिवाद झाला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे.

    Read more

    Chhagan Bhujbal : मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, भुजबळांचा पुनरुच्चार

    कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट करत मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा पुनरुच्चार केला. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही. सुप्रीम कोर्टाने हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. हा समाज EWS मधून आरक्षण घेणार, कुणबीमधूनही घेणार, मग बाकीच्यांनी जायचे कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा समाजातील अभ्यासक व नेते या मुद्यावर बोलत नाहीत, असा टोलाही त्यांनी यावेळी मनोज जरांगे यांना हाणला.

    Read more

    Haribhau Rathod : मराठा आरक्षणावरून हरिभाऊ राठोड संतापले- आम्ही ओबीसी येडे आहोत का? भुजबळ एका समाजापुरतेच मर्यादित

    मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाला आता नवा कलाटणी मिळाली आहे. ज्येष्ठ ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी थेट राज्य सरकारवर तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हैदराबाद गॅझेट, कुणबी प्रमाणपत्र, तसेच बंजारा समाजाच्या प्रश्नांवरून त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मराठा समाजापेक्षा बंजारा समाजाची ताकद अधिक असल्याचा दावा करत त्यांनी मराठवाड्यात बंजारा समाजाविना कोणी निवडणूक जिंकून दाखवावी, असा थेट इशाराच दिला. राठोडांच्या या विधानामुळे ओबीसी व मराठा समाजातील मतभेद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा पलटवार- छगन भुजबळ पूर्णपणे पागल झालेत, मी अशिक्षित असूनही त्यांना रडकुंडीला आणले; आंबेडकरांनाही आवाहन

    मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शुक्रवारी ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ आपल्या डावपेचांमुळे पूर्णतः वेडेपिसे झाल्याचा दावा केला. मी अशिक्षित आहे. पण त्यानंतरही छगन भुजबळांना मी सरकारकडून काढून घेतलेल्या जीआरमध्ये कोणतीही सुधारणा करता येत नाही. यामुळे ते अक्षरशः वेडेपिसे झालेत झालेत, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना कोणत्याही एका जातीची बाजू घेऊन न बोलण्याची विनंती केली.

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार- मराठा आरक्षणाचा GR कायदेशीरच; आमचे सरकार असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही

    मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने काढलेला GR पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या जीआर विरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मात्र, त्याच बरोबर आमचे सरकार असेपर्यंत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या जीआरला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांनी आधी जीआर समजून घेण्याची मागणी देखील त्यांनी केली.

    Read more

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा भुजबळांवर पलटवार- ओबीसी समाजाला एक दुष्ट विचारांचा नेता मिळाला, ओबीसींत आमचे स्थान मिळवूनच राहू

    मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आज पुन्हा एकदा सरकारच्या शासन निर्णयावर तसेच मराठा आरक्षणावर भाष्य करत टीका केली आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी देखील प्रत्युत्तर देत टीका केली आहे. ओबीसी समाजाला एक दुष्ट विचारांचा नेता मिळाला आहे, जो आपल्या स्वार्थासाठी इतरांना वेगळे आमिष दाखवून कामाला लावतो, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला.

    Read more

    Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले- खोटी प्रमाणपत्रे जात बदलू शकत नाहीत, मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण असताना हैदराबाद गॅझेट कशासाठी?

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील ओबीसी समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी उघडपणे सरकारने काढलेल्या शासन निर्णयाला विरोध केला आहे. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आज पुन्हा एकदा सरकारच्या शासन निर्णयावर तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे.

    Read more

    Pankaja Munde : मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट देता कामा नये; OBC उपसमिती बैठकीत पंकजा मुंडेंची भूमिका

    मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातील 8 मागण्यांपैकी 6 मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. सरकारने हैदराबाद गॅझेट नुसार शासन निर्णय जारी करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात आले. यावर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करत आज त्याची बैठक देखील पार पडली. ही बैठक महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

    Read more