Vijay Wadettiwar : मी शत्रू नव्हतो, तरीही भुजबळांनी मला का टार्गेट केलं?, विजय वडेट्टीवारांचा सवाल, मराठा-ओबीसी वादावरून सरकारवर हल्लाबोल
बीडच्या मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी मला का टार्गेट केले? मी तर कधीच त्यांचा शत्रू नव्हतो. त्यांचा विरोध केला नाही, त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही. मला निमंत्रण नव्हते, माझ्या मतदारसंघात काम होते म्हणून मी मोर्चाला जाऊ शकलो नाही म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भुजबळांना सवाल केला आहे.