Maratha-Kunbi : मराठा – कुणबी आरक्षण वाद, सुप्रीम कोर्टाचा ओबीसी संघटनेला अंशतः दिलासा, याचिका मुख्य प्रकरणासोबत ऐकण्याचे हायकोर्टाला निर्देश
मराठा-कुणबी आरक्षणासंदर्भातील सुनावणीत ओबीसी वेल्फेअर असोसिएशनला सर्वोच्च न्यायालयाकडून अंशतः दिलासा मिळाला आहे. संघटनेच्या याचिकेवर न्यायालयाने स्वतंत्रपणे तत्काळ सुनावणीचे निर्देश देण्यास नकार दिला असला, तरी ती याचिका मुख्य प्रकरणासोबत ऐकून घेण्याचे आदेश हायकोर्टाला देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 नोव्हेंबर रोजी होणार असून, त्यावेळी ओबीसी संघटनेची याचिकाही त्यात समाविष्ट केली जाईल.