Manu Bhaker : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार
पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये दोन पदके जिंकणारी मनु भाकर आणि किशोरवयीन जागतिक बुद्धिबळ विजेता डी गुकेश यांच्यासह चार भारतीय खेळाडूंना प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात खेळाडूंना पुरस्कार प्रदान केले.