चाणक्य फेम अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते रामतीर्थावर गोदावरीची महाआरती!!
चाणक्य फेम अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते काल चैत्र वद्य प्रतिपदेच्या दिवशी रामतीर्थावर गोदावरीची महाआरती करण्यात आली. मनोज जोशी हे त्यांच्या चाणक्य महानाट्याच्या निमित्ताने नाशिक मध्ये आले होते. यावेळी त्यांना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने गोदावरी महाआरतीचे निमंत्रण दिले. या निमंत्रणाचा सहर्ष स्वीकार करून मनोज जोशी आणि त्यांच्या टीमने रामतीर्थाला भेट दिली.