Manoj Jarange : आता वाशी-बिशी नाही, थेट मंत्रालयावर धडकणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा, 29 ऑगस्टला समाजबांधवांसह मुंबईत मोर्चा
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असून, मुंबईत मंत्रालयावर थेट धडक देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 27 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. दोन दिवसांत मुंबई गाठून 29 ऑगस्ट रोजी तेथे शांततेत आंदोलन होणार आहे. रविवारी आंतरवालीत पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची घोषणा केली.