Shinde Committee : मराठवाड्यातील मराठे कुणबी असल्याचे तत्त्वतः मान्य; शिंदे समितीचा जरांगेंना शब्द
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे समितीला चर्चेसाठी पाठवून राज्याच्या राज्य सरकारसह राज्याच्या राजभवनाचा व दोन्ही कायदेमंडळांचा अपमान केल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शनिवारी केला. सरकारने आमच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाला पाठवण्याची गरज होती. पण त्यांनी शिंदे समितीला पाठवले. हे साफ चूक आहे. असे करून फडणवीसांनी राज्याचा अपमान केला, असे ते म्हणाले. दरम्यान, न्या. संदीप शिंदे समितीने यावेळी मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबी असल्याचे तत्वतः मान्य केले. हा मराठा समाजासाठी एक मोठा दिलासा असल्याचा दावा केला जात आहे.